आयसीसी क्रमवारीत आमचा पहिला नंबर

team-india
दुबई – भारतीय संघाने रांचीमध्ये श्रीलंकेला अखेरच्या सामन्यासह एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकल्यामुळे आयसीसीच्या सांघिक एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे.

भारताचे श्रीलंकेविरुद्धची मालिका सुरु झाली त्यावेळी ११३ गुण होते. मालिकेतील या विजयामुळे भारताच्या खात्यात आणखी चार गुणांची वाढ होत ११७ गुणांसह भारताने या क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका ११५ गुणांसह दुस-या स्थानी आहे तर ऑस्ट्रेलिया ११४ गुणांसह तिस-या स्थानी आहे.

श्रीलंका संघाने भारताविरुद्धच्या मालिकेत एकही सामना जिंकू न शकल्यामुळे या क्रमवारीत आपले चौथे स्थान कायम राखले असले तरी मात्र त्यांच्या गुणांमध्ये घसरण झाली आहे. त्यापाठोपाठ इंग्लड केवळ एक गुणाच्या पिछाडीने पाचव्या क्रमांकावर आहे.

Leave a Comment