अमेरिकेचा शोध कोलंबसाने नाही, मुस्लीमांनी लावला- तैय्यप

tayyip
तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसेप तैय्यप यांनी शतकांचा इतिहास चुकीचा ठरविताना अमेरिकेचा शोध कोलंबसाने नव्हे तर मुस्लीमांनी लावला होता असा दावा केला आहे. इस्तंबुल येथे लॅटिन अमेरिकेतून आलेल्या मुस्लीम नेत्यांच्या सभेत बोलताना तैय्यप यांनी कोलंबसापूर्वी तीन शतके म्हणजे १२ व्या शतकातच मुस्लीमांनी अमेरिकेचा शोध लावला होता असा दावा केला आहे.

ते म्हणाले लॅटिन अमेरिका आणि इस्लाम यांच्यात १२ व्या शतकापासूनच संबंध होते. मुस्लीमांनी ११७८ मध्येच अमेरिका शोधली होती. मुस्लीम नाविक प्रथम येथे पोहोचले होते. कोलंबसाने क्युबाच्या तटावर असलेल्या पहाडावर मशीदचे अस्तित्व असल्याचा उल्लेखही केला होता. त्याने अमेरिकेचा उल्लेख केला नव्हता. आजपर्यंतच्या ज्ञात इतिहासानुसार कोलंबसाने भारतासाठी दसर्‍या समुद्रमार्गाचा शोध घेण्यासाठी आखलेल्या मोहिमेत तो भारताऐवजी १४९२ मध्ये अमेरिकेच्या किनार्‍याला लागला होता.

Leave a Comment