’रेड कॉरिडॉर’चा उलगडा करण्यात पोलिसांना आले यश

ats
पुणे – गडचिरोलीच्या जंगलासह देशभरातील ’रेड कॉरिडॉर’मधील नक्षलवाद्यांशी पुण्याहून साधल्या जाणार्याो संपर्काच्या नेटवर्कचा मागोवा शोधण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नुकत्याच अटक केलेल्या संशयित नक्षलवाद्यांकडून संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठीचे ’कोडवर्ड’ उकलले असून, त्याद्वारे पुण्यातून मोठ्या प्रमाणात कपडे, शूज, गोळ्या औषधांची रसद जंगलात पुरविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. नक्षलवादी कारवाया करीत असलेल्या ’रेड कॉरिडॉर’मध्ये पुण्यातील नक्षलवाद्यांच्या ’स्लिपर सेल’मधील मोठ्या प्रमाणात रसद पुरवली जात असल्याची शक्यता व्यक्त होत होती. त्या संदर्भातील पुरावे नव्हते. ’एटीएस’च्या कारवाईत पुणे-मुंबई-सुरत या कॉरिडॉरमध्ये संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी वापरलेले कोडवर्ड उकलण्यात आले आहेत. त्याच्याच माध्यमातून कशी, कोणी आणि कोठे मदत पुरवली, त्यासाठीचे नियोजन पुणे-मुंबईत बसून कसे केले, याचे ठोस पुरावे प्रकाशात आले आहेत.

Leave a Comment