घटस्फोटाच्या प्रमाणात व्हॉट्‌स-ऍपमुळे वाढ

whats
नवी दिल्ली – तरुणाईसाठी ‘दिल की धडकन’ झालेले व्हॉट्‌स अप कुटुंबव्यवस्थेला हानिकारक ठरत असून जगभरात व्हॉट्‌स ऍपवरील संदेश घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये पुराव्यादाखलही वापरण्यात येत आहेत.

इटलीत घटस्फोटांची चाळीस टक्के प्रकरणे व्हॉट्‌स ऍपशी संबंधित असून याशिवाय, व्हॉट्‌स ऍपमुळे अनेक नवे मित्र-मैत्रिणी बनवून आपल्या साथीदाराला धोका देण्याचे प्रमाणही वाढले आहे. लघुसंदेशांच्या माध्यमातून आपल्या जोडीदाराला फसविण्याचा प्रकार होत असे. त्यानंतर, फेसबुक आणि आता व्हॉट्‌स ऍपमुळे जोडीदारापासून आपले प्रेमप्रकरण लपविणे तुलनेने सोपे झाल्याचे निरीक्षण जगभरातील कायदेतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

आपल्या वैयक्तिक गोष्टी मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करण्याचे प्रमाण वाढले असून, याचे दूरगामी परिणाम संबंधितांच्या जीवनावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटची सहज उपलब्धता असल्यामुळे व्हॉट्‌स ऍपचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिणामी, नातेसंबंधांमध्ये तणाव, फसवणूक आणि घटस्फोटांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

Leave a Comment