नवी दिल्ली – आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांचा समावेश नव्हता, परंतु या प्रकरणी त्याचा जावई मयप्पन हा सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याचा उल्लेख केला आहे.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीनिवासन यांना क्लीनचिट
मुदगल समितीच्या अहवालानुसार अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि राजस्थान रॉयलचा सहमालक राज कुंद्रा देखील सट्टेबाजांच्या संपर्कात होता. त्याच बरोबर मयप्पन हा सट्टेबाज आणि मैदानातील हालचाली पोहचविण्याचे काम करीत असे. परंतु मयप्पन याच्या विरोधात अजूनही कोणताही सबळ पुरावा हाती न आल्याचा उल्लेख देखील या अहवालात केला आहे.