लवकरच सुरू होणार खारघर टोलनाका

tollplaza
मुंबई – खारघर येथील बहुचर्चित टोलनाक्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून तो लवकरच सुरू होणार असून दरम्यान स्थानिकांना या टोलमधून सवलत मिळणार नसल्याने संतापाची लाट पसरली आहे.

या महामार्गावरील कामोठे येथील दुहेरी मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट ठेवले असून या रस्त्यांचे काम पूर्ण करा, त्यानंतरच टोलनाके उभारा, अशी संतप्त भावना रोज प्रवास करणा-या प्रवाशांनी केली आहे. या मार्गाचे काँक्रिटीकरण काम युद्धपातळीवर सुरू आहे.मात्र कामोठे वसाहतीच्या प्रवेशद्वाराचा मार्ग अडगळीचा बनला आहे. वसाहतीत शिरण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. फुटपाथचे कामही अर्धवट आहे. स्थानिकांच्या टोल माफीचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे टोल सुरूहोताच वाद होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment