मुंबई – सप्टेंबरमध्ये भविष्य निर्वाहनिधी संघटनेने (ईपीएफओ) १२.२८ लाख दावे निकाली काढले असून याबरोबरच या वर्षभरात निकाली काढण्यात आलेल्या दाव्यांची संख्या ६६.११ लाखांवर गेली आहे.
भविष्य निर्वाहनिधी संघटनेने १२.२८ लाख दावे काढले निकाली
सप्टेंबरमध्ये ७४ टक्के दावे हे १० दिवसांच्या आत निकालात, तर ९९ टक्के दावे ३० दिवसांच्या मुदतीत हातावेगळे करण्यात यश आले आहे. १००० रुपयांचे किमान पेन्शन सुरू करण्यासाठी देशभरातील सर्व कार्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन हा क्षण अविस्मरणीय करण्यात आला. या कार्यक्रमांना ‘पेन्शनधारकांचा सन्मान’ असे नाव देण्यात आले होते. याबरोबरच या महिन्यामध्ये युनिव्हर्सल अकाउंट संख्या आणि केवायसी विवरण प्रक्रिया जोरदारपणे राबवण्यात आली. यामध्ये २.६७ कोटी केवायसी रेकॉर्ड एकत्रित करण्यात आला.