भारतातील राष्ट्रीय उद्यानांची ओळख – भाग ८

sunderban
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान
हे भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यात असूनबांगलादेशाच्या सीमेलगत आहे. या उद्यानाचे वैशिष्ठ्य म्हणजे इथे जगातील सर्वाधिक वाघांची संख्या आढळते. अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गामुळे तसेच मोठ्या प्रमाणावर आढळणारे वन्यप्राणी व पक्षी यांमुळे याची जागतिक वारसा स्थान म्हणून निवड झाली आहे

सुंदरबन चे सर्वात प्रमुख वैशिष्ठ्य म्हणजे येथील वाघांची संख्या. भारतातील सर्वाधिक वाघ येथे आढळून येतात. जंगल हे खारफुटीचे व दलदलमय असल्याने जंगलात प्रवेश करून वाघ पहाणे येथे अवघड असते. तसेच येथील वाघ माणसांच्या बाबतीत अत्यंत आक्रमक आहेत. वाघांच्या माणसावरील हल्याच्या सर्वाधिक घटना सुंदरबनच्या प्रदेशात होतात. अभ्यासकांच्या मते खार्याशपाण्यामुळे येथील वाघ जास्त आक्रमक आहेत व त्यामुळे नरभक्षक बनतात तरीही कोणीही ठामपणे सांगू नाही शकत की येथीलच वाघ माणसांबाबतीत आक्रमक का आहेत. काही भक्ष्य न मिळाल्यास येथील वाघ मासे देखील मारुन खातात.

वाघांच्या मुख्य खाद्यामध्ये चितळ व बाराशिंगा ही हरीणे येतात. चितळांची संख्याही बरीच आहे. येथील चितळांचे खुर इतर चितळांपेक्षा थोडीशी वेगळी आहेत व दलदलीमध्ये व पाण्यामध्ये पोहोण्यासाठी अनूकूल बनले आहेत. इतर प्राण्यांमध्ये माकडे, रानडुक्कर, मुंगुस, खोकड, रानमांजर, खवलेमांजर येतात.

सापांच्या अनेक प्रजाती येथे आढळतात. विविध प्रकारचे पाणसाप, अजगर, अनेक विषारी साप जसे की नाग, नागराज, फुरसे, घोणस, मण्यार, पट्टेरी मण्यार, समुद्री साप तसेच इतर सरपटणार्याज प्रजाती उदा:घोरपडी, मगरी, अनेक प्रकारची समुद्री कासवे तसेच काही जमीनीवरील कासवे येथे आढळतात.

गोसाबा ५० किमी, कोलकाता ११२ किमी, कोलकाता डम डम विमानतळ ११२ किमी, रेल्वेस्थानक- कॅनिंग ४८ किमी वर

भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – नोव्हेंबर ते फेब्रुवारी

Leave a Comment