भारतातील राष्ट्रीय उद्यानांची ओळख – भाग ७

tadoba
ताडोबा राष्ट्रीय उद्यान
मध्य भारतातील गोंड साम्राज्याच्या आठवणी जपणारे हे एक महाराष्ट्रातील उत्तम जंगल. १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळवलेले हे जंगल १९९५ मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषीत केले आणि त्याच वेळेस त्याच्या बाजूचे अंधारीचे जंगल यात जोडले गेले. मिश्र पानगळीचे जंगल आणि जंगलाच्या मध्यभागी असणारे ताडोबाचे मोठे तळे हे इथले खास वैशिष्टय़. वाघांकरिता प्रसिद्ध असले तरी अस्वल, बिबळ्या, रानकुत्रे अथवा ढोल, गवे हे इथे तुम्हाला हमखास दिसणार. पूर्ण वर्षभर उघडे असणारे हे जंगल मात्र दर मंगळवारी बंद असते याची पर्यटकांनी नोंद घ्यावी.

उत्तम काळ : डिसेंबर ते मे. उन्हाळ्याचे गरम महिने वन्य जीवन बघण्यासाठी उत्तम.

क्षेत्रफळ : ६२६.०० चौ. कि.मी.

अंतर : मोर्ही २० कि.मी, चंद्रपूर ४५ कि.मी., नागपूर २०० कि.मी.

Leave a Comment