भारतातील राष्ट्रीय उद्यानांची ओळख – भाग ५

ranthmbore
रणथंभोर राष्ट्रीय उद्यान
राजस्थानमधील अरावली आणि विंध्य पर्वतराजींमध्ये हे रणथंभोर उद्यान वसलेले आहे. अतिशय प्राचीन ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभलेल्या या उद्यानात भारतातील २ नंबरचा मोठा रणथंभोरचा किल्लासुद्धा आहे. आज जगात भारतीय वाघांचे जे काही छायाचित्रण झाले आहे त्यातील सर्वाधिक छायाचित्रण हे याच उद्यानात झालेले आहे. पदम, मिलक आणि राजबाग या तलावांच्या आसपास दिसणारे वाघ हे इथले खास वैशिष्टय़. जर तुम्ही खरोखरच नशीबवान असाल तर तुम्हाला इथे वाघ आणि मगरीच्या तावडीत सापडलेले सांबर हरिण आणि त्यांच्यात चाललेली चढाओढसुद्धा बघता येईल.

उत्तम काळ : नोव्हेंबर ते मे. प्राणी जास्तीत जास्त दिसण्याचा काळ म्हणजे एप्रिल आणि मे महिना. नल घाटी, कचिदा आणि इथले तलाव हे खास भाग. पावसाळ्यात पूर्ण बंद.

क्षेत्रफळ : १३३४.६४ चौ. कि.मी.

अंतर : सवाई माधोपुर १२ कि.मी, जयपूर १७५ कि.मी. दिल्ली ३५० कि.मी.

Leave a Comment