भारतातील राष्ट्रीय उद्यानांची ओळख – भाग ३

badhavgarh
बांधवगड अभयारण्य
मध्यप्रदेशातील हे अभयारण्य 1968 साली घोषित केले गेले असून भारतात सर्वाधिक वाघ असलेले अभयारण्य म्हणून त्याची खास ओळख आहे. अलिकडे हा मान तोडोबा राष्ट्रीय उद्यानाकडे गेला असला तरी आजही खास वाघांसाठी बांधवगडला जाणार्या प्राणीप्रेमींची संख्या खूपच जास्त आहे. राहण्यासाठी आत व बाहेर दोन्ही कडे लॉजेस आहेत.

बांधवगडला जाऊन एखादाच वाघ पाहणारा खरा दुर्देवी समजला जातो. कारण येथे अक्षरश: कळपात वाघ दिसतात. उद्यानात जीपने जाताना बरेचवेळा वाघ स्वागतालाही हजर असतात.अनेकांनी येथे वाघाला शिकार करतानाही पाहिले आहे. येथे वाघांबरोबरच चित्तेही मोठ्या संख्येने आहेत आणि येथे त्यांचे ब्रिडींग यशस्वीही ठरले आहे. या अरण्यात सस्तन प्राण्यांच्या 37 प्रजाती, 250 प्रजातींचे पक्षी आणि फुलपाखरांच्या 80 प्रजाती मोजल्या गेल्या आहेत.

या अभराण्याचे खास आकर्षण आहे ती वनराणी वाघीण सीता. नॅशनल जिओग्राफिकच्या कव्हरवर तर ती झळकली आहेच पण जगात सर्वाधिक फोटो काढली गेलेली वाघीण असाही तिचा लौकीक आहे. या अभयारण्याच्या मध्यावर बांधवगड किल्ला आहे. या किल्ल्यावर पहिल्या शतकातील गुहाही आहेत. जंगलाला भेट देण्यासाठी सफारीही उत्तम व्यवस्था आहे. सूर्योदयापासून सूर्यास्त अशी वेळ असून हंगामानुसार ती बदलते. जबलपूर हे जवळचे मोठे शहर असून कटनी आणि उमरिया ही दोन रेल्वे स्टेशनही येथे जाण्यासाठी आहेत. हे जंगल बस मार्गानेही चांगले जोडले गेलेले आहे. नोव्हेंबर ते फेब्रूवारी हा चांगला सीझन मानला जात असला तरी वाघ मुक्तपणे पाहायचे असतील तर उन्हाळ्यात येथे जायला हवे. उकाड्याच्या त्रास झाला तरी गवत वाळलेले असते व त्यामुळे वाघ सहज टिपता येतात. म्हणजे गोळ्या घालण्यासाठी नाही तर फोटोत बंद करण्यासाठी. हा सीझन आहे मार्च ते मे.

Leave a Comment