भारतातील राष्ट्रीय उद्यानांची ओळख – भाग २

kazhi
काझीरंगा नॅशनल पार्क
आसाम राज्यातील हे पार्क जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. एकशिंगी गेंडे आणि गंगेतील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले डॉल्फिन मासे पाहायचे असतील तर या अभयारण्याला भेट देण्याशिवाय गत्यंतर नाही. बंगाल टायगर, रानरेडे, गवे, ही अन्य आकर्षणे. देशातील हे सर्वात प्रसिद्ध असे अभयारण्य. जगातील एकूण एकशिंगी गेंड्यांतील सुमारे 2/3 सं‘या याच अरण्यात आहे. शिवाय नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अन्य 15 जातींच्या सस्तन प्राण्यांचेही हे माहेरघर आहे. पक्षी निरीक्षणासाठीही हे अभयारण्य प्रसिद्ध आहे.

बर्डलाईफ इंटरनॅशनल ने पक्षी निरीक्षणासाठी या अभयारण्याचा खास उल्लेख केला आहे. अनेक प्रकारचे पक्षी, स्थलांतरीत पक्षी पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी होत असते. या अरण्यात वाघ मोठ्या संख्येने आहेतच पण त्याचबरोबर अजगरे, किंग कोब्रासारखे अतिविषारी सापनाग, 15 प्रकारची कासवे, आसाम रूफ्ड टर्टल, ससे, मुंगुसे, बंगाली कोल्हे, चायनीज फेरेट बेजर, चायनीज पंगोलिन हे प्राणीही येथे पाहण्यास मिळतात.

हे अभयारण्य 1974 साली घोषित केले गेले असून तेथे जाण्यासाठी नोव्हेंबर मध्य ते एप्रिलची सुरवात हा चांगला सीझन आहे. अभयारण्याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 अशी असते. जोरहाट हा जवळचा विमानतळ, गुवाहाटीपासूनही येथे रेल्वे अथवा बसने जाता येते. नवागाव, दिब्रूगड, तेजूपर ही जवळची शहरे असून येथूनही बसने येथे जाता येते.

Leave a Comment