जर्काता – शनिवारी सकाळी ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूंकपाच्या धक्क्याने पूर्व इंडोनेशियातील मलुकु बेट हादरले. या भूकंपामुळे कुठलीही जिवीतहानी झाली नसली तरी या भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
भूंकपाच्या धक्क्याने हादरले इंडोनेशिया
या भूकंपाचा केंद्रबिंदू कोटा टर्नेटपासून १५४ कि.मी. अंतरावर उत्तरपश्चिमेला असलेल्या समुद्रात ४६ कि.मी. आत होता. केंद्रबिंदूपासून ३०० कि.मी. च्या किनारपट्टी भागात त्सुनामीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याचा इशारा पॅसिफित त्सुनामी इशारा केंद्राने दिला आहे.
इंडोनेशिया, फिलिपाईन्स, जपान, तैवान आणि दक्षिण प्रशांत महासागारातील बेटांना त्सुनामीच्या लाटा धडकू शकतात असे पॅसिफिक त्सुनामी इशारा केंद्राने म्हटले आहे. तीस सेंटीमीटर ते एक मीटर उंचीच्या लाटा इंडोनेशियाच्या बेटांना धडकू शकतात तर, फिलिपाईन्समध्ये तीस सेंटीमीटर पेक्षा कमी उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.