जियोनीने आणले ४ जी तंत्रज्ञानावरील नवे स्मार्टफोन

gionee
नवी दिल्ली – चीनमधील मोबाईल निर्माती कंपनी असलेल्या जियोनीने भारतीय बाजारांत चार नवे स्मार्टफोन दाखल केले आहेत. पायोनियर पी ५ एल, पायोनियर पी ४ एस, पी ६ आणि सीटीआरएल वी ६ एल हे चारही स्मार्टफोन बाजारात विक्रीसाठी पुढच्या महिन्यात उपलब्ध होतील, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.

हे चारही फोन ४जी व्हर्जनचे असून यामध्ये ‘वी६एल’, ‘पी५एल’, ‘पी४एस’ आणि ‘पी६’ या फोनचा समावेश आहे. ‘वी६एल’ या फोनमध्ये ५ इंचचा डिस्प्ले, ८ मेगापिक्सल रियर कॅमेरा, १.२गीगाहर्टज् क्वॉडकोर प्रोसेसर, १९५० एएमएच बॅटरी, १जीबी रॅम या सुविधा देण्यात आल्या असून, हा फोन अँड्राइड ४.४ किटकॅट व्हर्जनवर आधारीत आहे. या फोनची किंमत १५००० रूपये आहे, तर पी५एल हा फोन १०,००० रूपयांना उपलब्ध करण्यात आला आहे.

Leave a Comment