व्हाईट स्पेस वापरून मायक्रोसॉफ्टची मोफत इंटरनेट सेवा

micro
दिल्ली – भारताच्या सर्व प्रांताना इंटरनेट कनेक्ट करण्याची योजना मायक्रोसॉफ्टने तयार केली असल्याचे वृत्त आहे. या सेवेच्या विस्तारासाठी मायक्रोसॉफट व्हाईट स्पेसचा उपयोग करणार असल्याचे समजते. व्हाईट स्पेस म्हणजे दोन टिव्ही चॅनलच्या मधला मोकळा स्पेक्ट्रम. मायक्रोसॉफ्टने देशभरात मोफत इंटरनेट सेवा देणार असल्याची घोषणा केली असून त्यासाठी सरकारी दूरदर्शन चॅनलच्या मोकळ्या असलेल्या व सध्या वापरात नसलेल्या स्पेक्ट्रमवर आपले लक्ष केंद्रीत केले असल्याचे समजते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया कार्यक्रमाची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टने ही योजना सादर केली आहे. वायफाय सेवेत १०० मीटर अंतरापर्यंतच कनेक्टिव्हीटी मिळू शकते मात्र व्हाईट स्पेसचा वापर केल्यास ही कनेक्टीव्हीटी १० किमी अंतरापर्यंत मिळते. मायक्रोसॉफ्टने दोन मोठ्या राज्यात या सेवेचा प्रारंभ करण्यासाठी परवानगी मागितली आहे. या योजनेमुळे अडीच लाख ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या जाणार आहेत. त्यासाठी १.२ अब्ज डॉलर्स खर्च अपेक्षित आहे.

मायक्रोसॉफ्ट व फेसबुकच्या भारतभर इंटरनेट जाळे विस्तारण्याच्या योजनेत जगातील अनेक बड्या कंपन्यांनी सहकार्य देऊ केले असल्याचेही समजते.

Leave a Comment