मुदगल समितीच्या अहवालात स्टुअर्ट बिन्नीच्या नावाचा उल्लेख

biiny
नवी दिल्ली : स्पॉटफिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीच्या अहवालात भारताचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट बिन्नीसह अन्य पाच जणांची नाव असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यामुळे भारतीय संघातून बिन्नीला बाहेर केले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने आपली वार्षिक सभा सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार पुढे ढकलली आहे.

मुदगल समितीच्या अहवालावरील सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी पाच जणांची नावे घेतली. श्रीनिवासन यांच्यासह स्टुअर्ट बिन्नी, इंग्लंडचा ओवेस शाह, आयपीएल सीईओ सुंदर रमण आणि राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा यांची नावे अहवालात असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे. मात्र त्यांची नेमकी भूमिका काय आहे, किंवा त्यांच्यावर काही आरोप आहेत का, याविषयी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.याप्रकरणी पुढील सुनावणी २४ नोव्हेंबरला होणार आहे.

Leave a Comment