‘बॉक्सिंग इंडिया’ला कायमस्वरुपी सदस्यत्व

boxing-india
नवी दिल्ली – जेजू आर्यलड (दक्षिण कोरिया) येथे पार पडलेल्या बैठकीत एआयबीए या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघामध्ये ‘बॉक्सिंग इंडिया’ला कायमस्वरुपी सदस्यत्व देण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात असून भारतीय बॉक्सिंग संघटनेवर एआयबीएने डिसेंबर २०१२ पासून बंदीची कारवाई केली होती. मात्र एआयबीएच्या नियमांप्रमाणे निवडणुका लढवून ‘बॉक्सिंग इंडिया’ने भारतीय बॉक्सिंगला पुन्हा मुख्य प्रवाहात आणले.

बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोदिया यांनी एआयबीएचे कायमस्वरुपी सदस्यत्व मिळाल्याने खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment