पुण्याच्या वैदहीचे गुगलवर डुडल

google
मुंबई – बालदिनाच्या निमित्ताने लहान मुलांसाठी गुगलने खास चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पुण्याच्या वैदही रेड्डीने बाजी मारली असून या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाचे चित्र बालदिनी म्हणजेच आज दिवशी गुगलच्या होमपेजवर डुडल म्हणून प्रसिध्द करण्यात येणार होते. त्यानुसार वैदहीने आसामवर रेखाटलेले चित्र गुगलच्या होमपेजवर डुडल म्हणून दिसत आहे. गुगलने ‘मला जायला आवडेल असे भारतातील ठिकाण’ असा विषय दिला होता. मुलांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी गुगलने या विषयाची निवड केली होती.

या चित्रसाठी नैसर्गिक आणि सांस्कृतिक नंदनवन असलेल्या आसामची निवड वैदहीने केली. या चित्रातून वैदहीने आसामचे वन्यजीवन, संस्कृती आणि निर्सगसौदर्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment