आता वाढणार पेट्रोल व डिझेलचे दर

petrol
नवी दिल्ली – पेट्रोलियम कंपनीने नुकतीच पेट्रोल व डिझेलचे दरामध्ये कपात केली होती मात्र भाजप सरकारने पेट्रोल व डीझेल वर एक्साईज डुयटी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोल व डिझेल वर हा कर लादला जाउन पेट्रोल व डिझेल २ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

वित्त मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, अनबॅण्डेड डिझेलवरील उत्पादन शुल्क १.४६ रुपयावरून वाढवून २.९६ रुपये प्रतिलीटर करण्यात आले आहे, तर ब्रँडेड डिझेलवर हे शुल्क ३.७५ रुपयावरून वाढून ५.२५ रुपये प्रतिलीटर झाले आहे. याचप्रमाणे अनब्रँडेड पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १.२० रुपये प्रतिलीटरवरून २.७० रुपये करण्यात आले आहे. तर ब्रँडेड पेट्रोलवर हे शुल्क २.३५ रुपयावरून ३.८५ रुपये प्रतिलीटर करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट होत असल्याने ऑगस्टनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सहावेळा कपात झाली होती. सातव्यावेळीही किमतीत कपात होण्याची शक्यता होती. मात्र, उत्पादन शुल्कात वाढ केल्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात होण्याऐवजी वाढ झाली आहे.

Leave a Comment