आता मोबाईलवर ‘फॅन्ड्री’

fandry
आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरही महाराष्ट्रभर गाजलेला ‘फॅन्ड्री’ हा मराठमोळा चित्रपट उपलब्ध होणार असून नुकताच हा चित्रपट गुगल प्ले, आय-ट्यून्स आणि फेसबूक प्रदर्शित करण्यात आला आहे. डिजिटल आणि सोशल मीडियाचा वापर करून मराठीत अशा प्रकारे प्रदर्शित होणारा ‘फॅन्ड्री’ हा पहिलाच चित्रपट ठरेल.

मोबाईल अॅप आणि डिजिटल माध्यमात रुपांत झाल्याने हा चित्रपट आता कोणत्याही देशामधून पाहता येणे शक्य होणार आहे. ‘सिने कारवान’ ही कंपनी या चित्रपटाच्या डिजिटल आवृत्तीचे प्रदर्शन करत असून अमेझॉन, फेसबुक, बी स्काय बी, नेटफिक्स यांसह अनेक सोशल व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट उपलब्ध आहे.

Leave a Comment