व्यापार मेळ्यात महाराष्ट्राच्या दालनाचे फडणवीस करणार उद्घाटन

devendra
दिल्ली – येथील प्रगती मैदानावर आजपासून सुरू होत असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळ्यातील महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असून शनिवारी म्हणजे उद्या येथे महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात येणार आहे. फडणवीस यांच्यासोबत राज्याचे उद्योगमंत्री प्रकाश मेहताही उपस्थित आहेत.

यंदा महाराष्ट्र दालनाची सजावट पुण्यातील ऐतिहासिक विश्रामबाग वाड्याच्या प्रतिकृतीने करण्यात आली आहे. यंदाची संकल्पना महिला उद्योजक अशी असून महाराष्ट्र लघु उद्योग प्राधिकरणातर्फे राज्यातील लघु उद्योजक, महिला उद्योजक, महिला बचत गट यांसह ७५ विविध स्टॉल्स येथे उभारले आहेत. यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलकही दाखविली जाणार असून मुंबईच्या साईलिला ग्रुपतर्फे विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहे. यावेळी प्रेक्षकांना खास मराठमोळ्या पदार्थांचा आस्वादही लुटता येणार आहे.

Leave a Comment