लंडन – दहशतवादी संघटना आयएसआयएससाठी लढणारी ब्रिटीश महिला दहशतवादी समांथा ल्यूथवेट मारली गेल्याचा दावा रशियाच्या वृत्तसंस्थेने केला आहे. समांथाला रशियाचा स्नायपरने मारल्याचे त्यात वृत्तसंस्थेने म्हटले आहे. ब्रिटनच्या मोस्ट वॉंटेड यादीतील ३० वर्षीय समांथा ’व्हाइट विडो’ नावाने कुख्यात होती. वृत्तसंस्थेने दावा केला आहे, की ज्या स्नायपरने समांथाला ठार केले आहे, त्याला रशिया सरकारने १० लाख डॉलर देण्याची घोषणा केली आहे. ’व्हाइट विडो’ने दोन महिन्यांपूर्वी आयएसआयएस (इस्लामिक स्टेट) जॉइन केले आहे. सीरियामध्ये महिला आत्मघाती पथकाला प्रशिक्षण देण्याची महत्त्वाची जबाबदारी तिला देण्यात आली आहे. ब्रिटनची वेबसाइट डेली मेल च्या वृत्तात ’व्हाइट विडो’ इस्लामिक स्टेटचे मुख्यालय रक्कामध्ये महिलांना प्रशिक्षण देतानाचे छायाचित्रात दाखविले होते. आयएसआयएस जॉइन केलयनंतर या दहशतवादी संघटनेतील उच्चपदस्थ नेत्यांमध्ये तिचा समावेश करण्यात आला होता. गेल्या तीन महिन्यांपासून ब्रिटन, अमेरिका आणि केनिया येथील सुरक्षा यंत्रणा तिचा शोध घेत होते.