डार्मस्टॅण्डट – युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने ‘फिली’ हा यंत्रमानव यशस्वीरित्या ६७ पी/ च्युरूयूमोव्ह गेरासिमेन्का’ या धूमकेतूवर उतरवला आहे. रोसेटा या अवकाशयानातून ‘फिली’ला धूमकेतूवर उतरविण्यात आले. युरोपीयन प्रमाणवेळेनुसार पहाटे तीनच्या सुमारास फिली धूमकेतूवर उतरला. अवकाश संशोधन क्षेत्रातील ही अत्यंत महत्वाची घटना असून, या मोहिमेद्वारे युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने एक नवी उंची गाठली आहे.
फिरत्या धूमकेतूवर मानवाचे यशस्वी पाऊल
फिलीचा प्रवास दशकभरापूर्वी म्हणजे मार्च २००४ मध्ये सुरू झाला होता. २००४ मध्ये रोसेटा अवकाशयान ६७ पी/ च्युरूयूमोव्ह गेरासिमेन्का धूमकेतूच्या दिशेने झेपावले होते. तब्बल पाच अब्ज किमीचा प्रवास करून, दहावर्षांनी रोसेटा धूमकेतूनजवळ पोहोचले.
जगभरातील अवकाश संशोधन संस्थांचे या मोहिमेकडे लक्ष लागले होते. कारण फिरत्या धूमकेतूवर यंत्रमानव उतरवणे म्हणजे एक आव्हान होते. फिली धूमकेतूकर विशिष्ट वेळेत पोहचू न शकल्याने युरोपियन अवकाश संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ चिंताग्रस्त झाले होते. पण शास्त्रज्ञांनी यशस्वीरित्या फिलीला ६७/पी च्युरूयूमोव्ह गेरासिमेन्काच्या बर्फाळ पृष्ठभागावर उतरवले.