नेपेडा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्म आणि दहशतवाद यांच्यात कोणत्याही प्रकारचा संबंध असता कामा नसल्याचे म्हटले असून, अतिरेक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी दहशतवादाविरोधातील लढाईत आंतरराष्ट्रीय भागीदारीची गरज व्यक्त केली आहे.
धर्माला दहशतवादाशी जोडणे चुकीचे : पंतप्रधान
इसिस या अतिरेकी संघटनेविरोधात जारी केलेल्या घोषणापत्राचे भारत स्वागत करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व आशिया संमेलनातील आपल्या अभिभाषणात बोलताना सांगितल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दिन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. वाढता दहशतवाद आणि कट्टरवादामुळे आज जगासमोरील आव्हानांमध्ये वाढ झाली आहे आणि संपर्क व समृद्धीचा स्रोत असलेले सायबर अंतराळ विश्वत नव्या संघर्षाचे व्यासपीठ होणार नाही, हे जगातील देशांनी सुनिश्चि्त करण्याची गरज आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.