स्मार्टफोनच्या विक्रीत ६५ टक्के वाढ

smart
दिल्ली – चालू वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत भारतात स्मार्टफोनच्या विक्रीत तब्बल ६५ टक्के वाढ झाल्याचा अहवाल कौंटर पॉईंट रिसर्च ने दिला आहे. इंटरनेटची सुविधा असलेल्या स्मार्टफोनला भारतीय ग्राहक अधिक पसंती देत आहेत आणि सहज परवडणार्‍या दरात असे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध असल्याने विक्रतील ही वाढ नोंदविली गेल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे. चालू तिमाहीत २ कोटी ३५ लाख स्मार्टफोन विकले गेले आहेत.

जुलै ते सप्टेंबर २०१३ मध्ये स्मार्टफोनची विक्री १ कोटी ४० लाख युनिट इतकी होती. एप्रिल ते जून २०१४ मध्ये १ कोटी ९० लाख स्मार्टफोन विकले गेले होते.मात्र जुलै ते सप्टेंबर या काळात हा आकडा २ कोटी ३५ लाखांवर गेला आहे असे आकडेवारीवरून दिसून आले आहे.

Leave a Comment