व्हॉटसअॅप मेसेजिंगमुळे इटालीत घटस्फोट वाढले

whats
व्हॉटसअॅप या फेसबुकच्या मेसेजिंग सेवेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे व त्यामुळे इटालीत घटस्फोटांचे प्रमाणही प्रचंड वाढले असल्याचा दावा इटालियन असोसिएशन ऑफ मॅट्रीमोनिअल लॉयर्स्र चे अध्यक्ष गियान गस्सानी यांनी केला आहे.

गस्सानी यांच्या म्हणण्याप्रमाणे सोशल मिडीयामुळे जोडीदाराशी प्रतारणा करणार्‍यांना चांगलीच संधी मिळते आहे. त्यामुळे घटस्फोट वाढले असून व्हॉटसअॅपवरील आपल्या जोडीदाराचे अन्य अनोळखी व्यकतींबरोबरचे फोटोच न्यायालयात व्याभिचाराचा पुरावा म्हणून सादर केले जात आहेत. प्रथम टेक्स्टींग, मग फेसबुक आणि आता व्हॉटसअॅपमुळे बाहेरच्या व्यक्तींशी संपर्क साधणे सहज सोपे झाले आहे. त्यातूनच जोडीदाराशी प्रतारणा करण्यासाठी लोक प्रवृत्त होत आहेत. प्रेमी युगले स्वतःचे इंटिमेट फोटो सर्रास पाठवित आहेत. आणि कांही वेळा तर अशी प्रकरणे एकाचवेळी दोन तीन जणांशीही सुरू ठेवली जात आहेत. व्हॉटसअॅप याबाबतीत डायनामाईट इतकेच विनाशकारी ठरते आहे.

इटालीत सध्या व्हॉटसअॅप मेसेजिंग ही सर्वात लोकप्रिय सेवा असून अहवालानुसार २०१२ मध्येच या सेवेने एकूण बाजारातील ८८ टक्के हिस्सा प्राप्त केलेला आहे. अर्थात यामुळे इटालीत कुटुंबव्यवस्था धोक्यात आली असून व्हॉटसअॅपच्या रूपाने या बुडत्या जहाजावर शेवटची काढी पडण्याची शक्यता असल्याची भीतीही या वकीलांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment