विश्वविक्रमी रोहित शर्माने रचला इतिहास

rohit-sharma

सलामीवीर रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यामध्ये आपले दुसरे द्विशतक साजरे करत भारतास 404 धावांचा डोंगर उभारुन दिला.  रोहित याने अवघ्या 151 चेंडूत कारकिर्दीमध्ये दुसऱ्यांदा द्विशतकास गवसणी घालत इतिहास घडविला.रो‍हित शर्माने 33 चौकार आणि 9 षटकारच्या मदतीने 173 चेंडूत 264 धावा केल्या.  एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासामध्ये दोन द्विशतके करणारा रोहित हा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

या अविस्मरणीय खेळीने रोहित याने एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासामध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सर केला.हा विक्रम  आधी   वीरेंद्र सेहवाग 219 धावा याचा  होता.

Leave a Comment