भारत माझे दुसरे घर- आंग सांग स्यूकी

syudi
म्यानमार – भारताशी माझ्या खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत. भारत हे माझे दुसरे घरच आहे अशी भावना म्यानमारच्या नोबेल पुरस्कार विजेत्या व विपक्ष नेत्या आंग सांग स्यूकी यांनी व्यक्त केली.बुधवारी म्यानमारच्या दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान मोदींशी त्यांची पहिलीच भेट झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. बुधवारी मोदींनी अनेक परदेशी नेत्यांशीही भेट घेऊन चर्चा केली आहे.

आंग सांग स्यूकी यांचे पिता आंगसान यांची हत्या झाल्यानंतर त्या त्यांच्या आईबरोबर भारतात रहात होत्या. त्यावेळी त्यांची आई म्यानमारच्या राजदूत म्हणून काम करत होत्या. स्यूकी याचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झाले आहे. श्रीराम कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली आहे. त्यामुळे त्यांना भारताविषयी ओढ आणि आस्था आहे.

मोदी या संदर्भात म्हणाले की दीर्घकाळ वादविवाद झाल्यानंतर स्यूकी यांना २०१५ ची संसदिय निवडणुक लढविण्याची परवानगी मिळाली आहे ही समाधानाची बाब आहे. स्यूकी यांना भारत भेटीचे आमंत्रण देणार का या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले की त्यांचे भारतात नेहमीच स्वागत आहे. भारत त्यांचे दुसरे घर आहे आणि आपल्याच घरी यायला बोलावणे कशाला हवे?

Leave a Comment