उद्धव करणार राज्याचा दौरा

uddhav
मुंबई – सत्तेसाठी अखेरपर्यंत प्रतिक्षा केल्यानंतर अखेर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आलेल्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे येत्या १७ नोव्हेंबरपासून महाराष्ट्राच्या दौर्‍यावर जाणार असल्याचे समजते. आपल्या दौर्‍याची सुरवात ते कोकणापासून करणार आहेत.

काल विधानसभेत फडणवीस सरकारने विश्वासदर्शक मत प्राप्त केल्यानंतर सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या आमदारांची बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्याच्या दौर्‍यावर जाणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की राज्यातील जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यासाठी आपण हा दौरा करणार आहोत. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काय घडले यावर वेळ आल्यानंतरच बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याच्या दौर्‍यात ते सेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणार आहेत असेही समजते.

Leave a Comment