विरोधी पक्षात बसणार शिवसेना

ramdas-kadam
मुंबई – शिवसेनेला शेवटच्या क्षणापर्यंत सत्तेची आस होती, पण भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या महिन्याभरापासून भाजपने शिवसेनेला सत्तेचे आमिष दाखवून झुलवत ठेवले होते. विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या अनेक फे-या झाल्या.

शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. या दरम्यान शिवसेनेला काही अपमानास्पद अनुभवही आले. मात्र भाजपने शेवटपर्यंत शिवसेनेला सत्तेमध्ये अपेक्षित असलेला वाटा द्यायला नकार दिला त्यामुळे शिवसेनेने अखेर विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपवर आता आमचा विश्वास राहिलेला नाही. भाजपकडून आम्हाला चर्चेमध्ये अपेक्षित प्रतिसादही मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत. सरकार विरोधात मतदान करणार आहोत अशी माहिती शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी बुधवारी सकाळी दिली.

Leave a Comment