आला मायक्रोसॉफ्टचा ल्युमिया ५३५

lumia
न्यूयॉर्क – गेल्याच महिन्यामध्ये नोकिया खरेदी करून मायक्रोसॉफ्टने नोकियाची ओळख पुसण्यास सुरुवात केली असून मायक्रोसॉफ्टने स्वत:च्या ब्रँडनिशी ल्युमिया ५३५ हा पहिलावहिला फोन बाजारात आणला आहे. १३५ डॉलर (सुमारे ८,२०० रुपये) किमतीच्या या फोनसह स्वस्त मोबाइलच्या बाजारपेठांमध्ये स्पर्धेसाठी तयार असल्याचे संकेत मायक्रोसॉफ्टने दिले आहेत.

या महिन्यापासूनच नवीन फोनची विक्री सुरू होण्याची शक्यता असून यासंबंधी कंपनीकडून काहीच सूतोवाच केलेले नाहीत. तसेच या फोनची भारतातील किंमतही घोषित करण्यात आलेली नाही. नोकिया फोन व्यवसाय खरेदी केल्यानंतर ल्युमिया सिरिजसह इतर काही फोन मायक्रोसॉफ्टने सादर केले. मात्र हे सर्व फोन नोकियाच्या ब्रँडखाली बाजारात आणण्यात आले. ल्युमिया ५३५ हा विंडो फोन असून याबरोबरच डेनिम अपडेटची सुविधाही यात मिळणार आहे.

Leave a Comment