नवी दिल्ली – दक्षिण कोरियाई कंपनी सॅमसंग लवकरच आपला शानदार फॅबलेट गॅलेक्सी नोट एज हा भारतासह इतर २२ देशांच्या बाजारात आणणार आहे. हा फॅबलेट फोन फक्त चीन, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतच उपलब्ध आहे.
लवकरच येतो आहे गॅलेक्सी नोट एज
मिळालेल्या बातमीनुसार ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, डेनमार्क, फिनलँड, जर्मनी, आइसलँड, फ्रांस, भारत, इटली, कजाकिस्तान, लग्जमबर्ग, नेपाळ, पोलँड, पोर्तुगाल, रशिया, सिंगापुर, स्पेन, स्विडन, स्विट्जरलँड, नीदरलँड आणि यूके या देशांच्या बाजारपेठेत हा फॅबलेट फोन आणणार आहे. परंतु अजून पर्यंत याची तारीख निश्चित झालेली पण १२ डिसेंबरला हा फोन डेन्मार्कमध्ये उपलब्ध होणार असून त्याची किमत जवळपास ८९९ युरो (६८,७०० भारतीय रुपये) असणार आहे.
या फॅबलेटचे विभिन्न मॉडेल लाँच होणार असून त्यातील एसएम-एन ९१५जी हे मॉडेल भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या फॅबलेटला याचवर्षी सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय टेक शो (आईएफए)च्या दरम्यान सादर केले गेले होते.
या फॅबलेटचे वैशिष्टय म्हणजे यामध्ये ५.६ इंच सुपर एमोल्ड डिस्प्ले, २.७ गीगा हर्ट्ज क्वाड-कोर प्रोसेसर, ३ जीबी रॅम, ६४जीबी इंटरनल मेमरी, १६ मेगापिक्सल रियर कॅमेरा, ३.७ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा व ३००० एमएएचची बॅटरी आहे.