बालकांचा डेंग्यूपासून बचाव करा

dengue
डेंग्यूच्या विकाराने सध्या सगळीकडेच थैमान घातलेले आहे. परंतु लहान मुलाला डेंग्यू झाला तर काय करावे, असा प्रश्‍न पडतो. कारण ते मूल डेंग्यूचा विकार झाला तरी काही सांगू शकत नाही. तेव्हा लहान मुलांना हा विकार झाला असल्याचे निदान वरकरणी दिसणार्‍या काही लक्षणांवरून करावे लागते. पहिले लक्षण म्हणजे एकदम ताप येणे आणि तो वाढणे. डोकेदुखी हेही एक डेंग्यूचे लक्षण आहे, परंतु लहान मूल डोके दुखत असल्याचे सांगू ंशकत नाही. तेव्हा खूप ताप आला की, डेंग्यूची शक्यता गृहित धरून डॉक्टरकडे न्यावे.

नाक सारखे वहात असेल किंवा त्वचेवर वळ्या उठत असतील, बाळाला खोकला येत असेल तरीही ही सारी लक्षणे डेंग्यूचा विकार असल्याचे सूचित करणारी असतात. डेंग्यूमध्ये रुग्णाला भूक लागत नाही. लहान मूल काही खायला नको म्हणायला लागले किंवा खाऊ घातलेला घास थुंकून टाकायला लागले की सावध व्हावे. जबरदस्तीने खाऊ घातलेले अन्न उलटूनही पडू शकतो. तेव्हा लहान मूल काही सांगू शकत नसल्यामुळे लक्षणांवरूनच त्याच्या डेंग्यूचा अंदाज घ्यावा लागतो.

असे असले तरी रक्ताच्या चाचणीशिवाय डेंग्यू असल्याचे स्पष्ट होत नाही. दरम्यान तशी शंका वाटत असेल तर पॅरासिटीमॉलची गोळी दिली जात असते. ही सगळी वेळ येण्याच्या आधी काही काळजी घेतली तर डेंग्यू टळू शकतो. त्यासाठी घराच्या आसपास किंवा घरात डास होऊ देऊ नयेत. मच्छरदानी वापरावी, घरात सतत मॉस्किटो पिल्स् लावलेल्या असाव्यात, बाळाला अंगभरून कपडे घालावेत, पायमोजे घालावेत, संध्याकाळी आणि सूर्योदयाच्या वेळी डास अधिक अधिक सक्रिय असतात. अशावेळी लहान मुलांना घराबाहेर नेऊ नये.