डी लॉरियन- जगातील एकुलती एक कार

nasacar
ब्रिटनच्या ब्रिस्टल येथील रहिवासी ओली विल्की सध्या फारच चर्चेत आहे मात्र त्याचे कारण आहे ती त्याच्या मालकीची कार. असली कार जगात कुणाकडेच नाही. डि लॉरियन असे नामकरण केलेली ही कार असेंबल्ड कार आहे आणि ती तयार केली आहे नासाच्या माजी इंजिनिअरने. केवळ रस्त्यातील गर्दीच नव्हे तर पोलिसांनाही या कारची मोहिनी पडत असल्याचे विल्की सांगतो.

या दोन सीटर कारमध्ये सामान ठेवण्यासाठी खूप जागा आहे. ती मागच्या बाजूने रिबिल्ड केली गेली आहे. तिच्यात असलेला डिजिटल स्पीडोमीटर ज्या जागी जायचे तेथे जाण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगतो तसेच ही कार शेवटची कधी चालविली गेली त्याची माहिती टाईम स्पीडसह मिळू शकते. नासातील युनिव्हर्सल स्टुडिओतील प्रशिक्षक असलेल्या इंजिनिअरने ही कार तयार केली होती. ती विल्कीच्या एका मित्राने प्रथम खरेदी केली आणि नंतर विल्कीला विकली.

विल्की सांगतो, ही कार भाड्याने देण्याचा व्यवसाय मी सुरू केला आहे. लोकांना ही कार खूपच आवडत असल्याचा माझा अनुभव आहे. अनेक शहरात ही कार नेली तेव्हा लोकांनी तिला गराडा घातला आणि माझ्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. या कारची साऊंड सिस्टीमही अतिशय सुंदर आहे.या कारमुळे अनेकवेळा पोलिसांचा ससेमिरा विल्कीमागे लागला मात्र तो त्याला पकडण्यासाठी नसून कारचे फोटो काढण्यासाठी होता असेही तो सांगतो. जगात अशा प्रकारची ही एकुलती एक कार आहे.

Leave a Comment