चीन प्रक्षेपित करणार १२० उपग्रह

upgrah
दूरसंचार दळणवळण आणि नैकावहन क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चीन नजिकच्या काळात १२० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार असल्याचे वृत्त आहे. चायना एरोस्पेस सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी कार्पोरेशनचे उपमहासंचालक यांग बाओहुआ यांनी ही माहिती दिली आहे.

बाओहुआ म्हणाले की चीनने स्वनियंत्रित अंतराळ पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. दूरसंचार क्षेत्राचा होत असलेला विकास आणि नाविक दळणवळणला वेग मिळावा यासाठी संदेश वहन करू शकणारे उपग्रह ही आमची गरज आहे. हे उपग्रह दीर्घ काळ व स्थायी स्वरूपात कार्यरत राहावेत असाही आमचा प्रयत्न आहे. या योजनेचा एक भाग म्हणून १२० उपग्रह अंतराळात पाठविले जाणार आहेत. किती कालावधीत हे उपग्रह प्रक्षेपित केले जातील याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही.

Leave a Comment