एक बटण दाबा- इबोला पिडीतांना देणगी द्या

mark
सोशल साईट फेसबुकने इबोला या जीवघेण्या साथीविरोधात लढा देण्यासाठी फेसबुक युजरना आगळी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. फेसबुकवर लवकरच एक बटण युजरला दिसणार आहे. हे बटण दाबून इबोला विरोधातील लढाईसाठी युजर देणग्या देऊ शकणार आहेत. या देणग्या प.आफ्रिकेतील इबोलाग्रस्तांसाठी मदत कार्य सुरू केलेल्या इंटरनॅशनल मेडिकल कॉप्र्स, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस, रेड क्रिसेंट सोसायटी आणि सेव्ह चिल्डन या चार संस्थांपैकी कुठेही युजर देऊ शकणार आहे.

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने फेसबुक इबोला प्रभावित क्षेत्रात १०० सॅटेलाईट कम्युनिकेशन टर्मिनल उपलब्ध करून देत असल्याची घोषणाही केली आहे. प.आफ्रिकेत आत्तापर्यंत या साथीने पाच हजारांवर मृत्यू झाले आहेत. मार्क आणि त्याची पत्नी प्रिसिला यांनी गेल्या महिन्यातच सेंटर फॉर डिसिज कंट्रोलकडे इबोला पिडीतांच्या मदतीसाठी २५ दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली आहे. आता फेसबुकचे युजरही फेसबुकवरील बटण दाबून इबोला पिडितांना मदत देऊ शकणार आहेत.

Leave a Comment