उद्या बँका बंद

strike
नवी दिल्ली – देशभरातील १० लाख कर्मचा-यांनी वेतनवाढी संदर्भात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आणि इंडियन बँक्स असोशिएशन यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्याने उद्या देशव्यापी संप पुकारला आहे.

२३ टक्के वेतनवाढीची मागणी बँक कर्मचा-यांकडून करण्यात आली असून, मात्र ११ टक्क्यांवर बँक असोशिएशन ठाम आहे. मुख्य कामगार आयुक्तांसोबतही यासंदर्भात चर्चा झाली. मात्र, दोन्ही बाजुच्या ताठर भूमिकेमुळे बँक कर्मचा-यांना वेतनवाढ मिळाली नसल्यामुळे बँक कर्मचारी आणि अधिकारी यांचे प्रतिनिधीत्व करणा-या नऊ संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांनी १२ तारखेला देशव्यापी संप पुकारला आहे. आंदोलनादरम्यान, राज्यात आणि जिल्हय़ात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर उद्या दुपारी १२ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment