आता प्रादेशिक भाषांमध्येही ‘प्लेइंग इट माय वे’

sachin-tendulkar
मुंबई – क्रिकेटचा विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या हॅचेट इंडियाने प्रकाशित केलेल्या ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्राला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून वाचकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे प्रकाशकांनी या पुस्तकाचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करायचे ठरवले आहे.

सचिनचे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर या पुस्तकाला वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे या पुस्तकाच्या भाषांतरासाठी आम्ही विविध भारतीय भाषांमधील प्रकाशकांशी चर्चा करत आहोत. या पुस्तकाचे भारतातील प्रमुख भाषा मराठी, हिंदी, गुजराती, मल्याळम, आसामी, तेलुगु आणि बंगाली भाषांमध्ये भाषांतर करण्याचा विचार आहे. काही आठवड्यातच याबाबतचा निर्णय होईल अशी माहिती हॅचेट इंडियाचे प्रकाशक पौलोमी चॅटर्जी यांनी दिली.

Leave a Comment