मुंबई – विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड रिंगणात उतरल्या असून राष्ट्रवादीने आपला उमेदवार न दिल्याने काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना रिंगणात उतरवले आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत
तर भाजपकडून फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडेंनी अर्ज दाखल केला आहे. तसेच शिवसेनेतर्फे पारनेरचे आमदार विजय औटींनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाचा मान कोणत्या पक्षाकडे जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान शिवसेना आमदारांच्या गोंधळानंतर अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली असून त्यानुसार दुपारी १२ ऐवजी ३ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी उमदेवारी अर्ज दाखल करता येणार आहे.