फेसबुक मेसेंजरला वाढता प्रतिसाद

facebook
न्यूयॉर्क – सोशल नेटवर्किंग साईटच्या अग्रस्थानी असलेल्या फेसबुकच्या मेसेंजरला उपभोत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. फेसबुक मेसेंजर वापरणा-यांची संख्या दरमहिन्याला ५० कोटीहूनही अधिक आहे.

ही मेसेंजर सुविधा चॅट फीचर म्हणून फेसबुकने सुरुवातीला वेबसाईटवर सुरु केली होती. त्यानंतर मोबाईल एँपमध्येही या मेसेंजर सुविधेने स्थान मिळवले. फेसबुक मेसेंजरला २०११ मध्ये लाँच करण्यात आले होते. आज दर महिन्याला सुमारे ५० कोटीहून अधिक यूझर्स फेसबुकच्या मेसेंजर सुविधेचा वापर करतात. असे फेसबुकचे उत्पादक व्यवस्थापनाचे संचालक पेटेर मार्टनझ्झी यांनी सांगितले.