सर्वात छोटा गुलाब गोल्डन बुक मध्ये नोंदला

rose
इंदौर – पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ.सुधीर खेतावत यांनी सतत दोन वर्षांच्या प्रयत्नातून जगातील सर्वात छोटे गुलाब पुष्प विकसित करण्यात यश मिळविले आहे. अवघ्या १ सेंमी व्यासाच्या गुलाबाचे त्यांनी डायमंड रोज असे नामकरण केले असून या गुलाबाची नोंद गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये करण्यात आली असल्याचे समजते.

खेतावत यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी विकसित केलेल्या या डायमंड रोजची जगातील सर्वाधिक छोटा गुलाब म्हणून गोल्डन बुकमध्ये नोंद केल्याचे प्रमाणपत्र त्यांना मिळाले आहे. गुलाबी आणि पांढर्‍या अशा दोन रंगात हा गुलाब त्यांनी विकसित केला आहे. या गुलाबावर आता ते पुढील संशोधनही करत आहेत.

Leave a Comment