शिवसेना आणि भाजपमधील चर्चा पूर्णपणे थांबली

shivsena
मुंबई : सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपमधील चर्चा पूर्णपणे थांबली असून विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा केला आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. निलम गो-हे यांनी विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याची माहिती दिली.

शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी सातत्याने भाजपकडून मिळणा-या अपमानास्पद वागणुकीबाबत काल नाराजी व्यक्त केली. भाजपाने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली नाही. उलट मंत्रिपदे, खातेवाटप यावर चर्चा करू नये, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमधील चर्चा थांबली आहे. आता शिवसेनेने विरोधीपक्ष नेतेपदावर दावा केला आहे.

Leave a Comment