मनोहर पर्रिकर – छोटे मोदी

manohar
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन केंद्रीय मंत्रीमंडळात संरक्षण खात्याचे मंत्रीपद मिळविलेल्या मनोहर पर्रिकर यांची राजकीय ओळख छोटे मोदी अशी आहे. आयआयटीयन असलेले पर्रिकर यांच्याकडे गोव्याचे राजकारण आमुलाग्र बदलणारे नेते म्हणून गोव्यात पाहिले जाते.

संघाच्या विचारधारेत वाढलेले पर्रिकर मोदींप्रमाणेच डिक्टेटर सारखे काम करतात. त्यांचाही त्यांच्या मंत्र्यांवर कमी विश्वास आहे. आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे चोवीस तास कामात घालविणारे पर्रिकर मोदींप्रमाणेच अतिशय शिस्तीचे, वेळेचे कोटेखोर नियोजन करणारे, स्वच्छ कारभार, साधी राहणी आणि मिडीयापासून दूर राहणारे नेते आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांच्या मालमत्तेत अगदीच मामुली याढ झाली असल्याचे सांगितले जाते. इंजिनिअर झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा कारखाना सुरू केला होता तो आता त्यांचा मुलगा सांभाळतो.

वास्तविक २००९ सालीच पर्रिकर केंद्रीय राजकारणात सक्रीय झाले असते. तेव्हाच त्यंच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा दिली जाणार होती मात्र एका मुलाखतीत ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांच्याबाबत त्यांनी कांही टिपण्णी केल्याने त्यांची ही संधी हुकली असे समजते. संरक्षण मंत्रालयासाठी कडक शिस्तीचा, त्वरीत निर्णय घेणारा आणि प्रामाणिक मंत्री असणे महत्त्वाचे मानले जाते आणि पर्रिकर या सार्या कसोट्या पार करणारे मंत्री ठरतील असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment