बहुचर्चित गुंड अक्कू यादव हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

akku-yadav
नागपूर : जिल्हा सत्र न्यायालयाने नागपुरातील बहुचर्चित गुंड अक्कू यादव हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

अक्कू यादवला दगडी इमारतीतील जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात १३ ऑगस्ट २००४ ला संतप्त जमावाने हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी २१ जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते. यामध्ये १४ पुरुष आणि ७ महिलांचा समावेश होता. अक्कू हा कस्तुरबानगर परिसरातील कुख्यात गुंड होता. बलात्कार, छेडछाड, हत्या, दरोडा, घरफोडी, खंडणी अशा विविध गुन्ह्यांमध्ये अक्कू आरोपी होता.

तब्बल १० वर्षांनी या ऐतिहासिक प्रकरणावर सत्र न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज निकाल दिला. अटक करण्यात आलेल्या १८ जणांविरोधात गुन्हा सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे पोलिसांकडे नसल्याने सर्वांची निर्दोष मुक्तता करत असल्याचे न्यायालयाने नमुद केले आहे. विशेष म्हणजे ज्या न्यायालयाच्या आवारात अक्कू यादवची हत्या झाली होती, त्याच न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

Leave a Comment