खडसेंना रावतेंकडून हिरवी टोपी सप्रेम भेट!

raote
मुंबई – शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी मराठी शाळांमध्ये ऊर्दू शिकवण्याच्या महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. कोणीही मागणी न करता ऊर्दू शिकवणा-या शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय खडसेंनी घेतल्याचा आरोप करत त्यांना हिरव्या रंगाची टोपी भेट म्हणून आणली.

आजपासून विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी विधीमंडळाच्या आवारात आल्यावर दिवाकर रावते यांनी खडसेंना हिरवी टोपी म्हणून देणार असल्याचे सांगितले आणि त्यांच्या निर्णयाचा निषेध केला.

प्रत्यक्षात खडसे यांचा शिक्षण विभागाशी संबंधही नाही. तरीसुद्धा मराठी शाळांमध्ये ऊर्दू भाषा शिकवणा-या शिक्षकाची भरती करण्याचा त्यांनी हा निर्णय घेतला. मराठी शाळांमध्ये एक जरी मुस्लिम विद्यार्थी शिकत असेल, तर तिथे ऊर्दू शिक्षक नेमावा लागेल, त्याच्या नमाजाची व्यवस्था करावी लागेल, असा विचित्र निर्णय खडसेंनी घेतला. म्हणूनच त्यांच्यासाठी आपण हिरव्या रंगाची मुस्लिम टोपी आणल्याचे रावतेंनी सांगितले.

Leave a Comment