ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

dhoni
मुंबई – सोमवारी ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून दुखापतग्रस्त महेंद्रसिंह धोनीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहली या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. भारताच्या कसोटी संघात तब्बल दोन वर्षांनी सुरेश रैनाने पुनरागमन केले असून के. एल. राहुल आणि करण शर्मा या नवीन चेह-यांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौ-यावर जात असून हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे. भारतीय संघ या दौ-यात चार कसोटी सामने खेळणार आहे. तसेच भारत, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड अशी तिंरगी मालिकाही रंगणार आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर रोहित शर्मालाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. शिखर धवनला श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी रोहित शर्माची वर्णी लागली आहे.

कसोटी संघ – महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना, रिद्धीमन शहा, नमन ओझा (विकेटकिपर), आर. अश्विन, करण शर्मा, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, वरुण अ‍ॅरोन

Leave a Comment