अँग्री बर्ड ट्रान्सफॉर्मर्स सादर

angri-bird
अँग्री बर्ड हा अतिशय लोकप्रिय गेम सादर करणार्‍या रोवियो कंपनीने या गेमचे अॅग्री बर्डस ट्रान्सफॉर्मर या नावाने नवीन व्हर्जन बाजारात सादर केले आहे. हा गेम गुगल प्ले स्टोअर्समध्ये उपलब्ध करून दिला गेला असून त्याला युजरकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे समजते.

रोविओच्या अँग्री बर्डस गेमला अतोनात लोकप्रियता लाभली होती. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांनीच या खेळाचा आनंद मनमुराद लुटला आहे.नवीन गेममध्ये हे अँग्री बर्डस ऑटो बर्ड होताना अनुभवास येणार आहे. गेम खेळण्याची पद्धत पूर्वीचीच आहे. हे ट्रान्सफॉर्मर बर्डस डिसेपीहॉग्ज बरोबर झुंजताना दिसतील. कंपनीने हा गेम यापूर्वी आयओएसवर सादर केला आहे आता तो अॅड्राईडवरही उपलब्ध करून दिला गेला आहे. पूर्वीच्या गेमप्रमाणेच या गेमलाही चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

Leave a Comment