राधाकृष्ण विखे पाटील यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी निवड

radha
नवी दिल्ली – राधाकृष्ण विखे पाटील यांची महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी तर उपनेतेपदी विजय वडेट्टीवारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरु होत असून त्याआधी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी घोषणा करण्यात आली.

महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता निवडण्याचा अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्यात आला होता. मागच्या आठवडयात गुरुवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीची बैठक विधानभवनात पार पडली.

यावेळी केंद्रीय निरीक्षक आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांनी काँग्रेसच्या विधानपरिषद आणि विधानसभेच्या सदस्यांची मते जाणून घेतली व नेता निवडीचा सर्वाधिकार सोनिया गांधी यांना देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता.

Leave a Comment