बास्मती पेटंट युद्धात अपेडा व पाक उत्पादक एकत्र

basmati
स्वाद, रूची, गंध आणि लांब दाणा असलेल्या बासमती तांदळाच्या भौगोलिक ओळख स्वामित्वाचा वाद आता चांगलाच पेटला असून त्यात प्रथमच भारतातील अपेडा ही कृषी संस्था व पाकिस्तानचे बासमती उत्पादक अशा दोघांनीही मध्यप्रदेश विरोधात आघाडी उघडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशाने गतवर्षी बासमती तांदळासाठी जिओग्राफिक आयडेंटिटी हा टॅग मिळविला मात्र त्याला भारतातील अपेडा व पाकिस्तानी बासमती उत्पादक संघटनेने न्यायालयात आव्हान दिले आहे. अपेडाने या संदर्भात गतवर्षीच दाखल केलेली याचिका ट्रेडमार्क व जेआय सहाय्यक रजिस्टारनी फेटाळून लावत मध्यप्रदेशलाही हे पेटंट दिले होते. परिणामी पंजाब, हरियानाप्रमाणेच मध्यप्रदेशालालही बासमतीसाठी परदेशी ओळख मिळविणे शक्य झाले आहे.

मात्र अपेडा आणि पाक उत्पादक यांच्या मते हा बौद्धीक संपदा हक्क असून तो मध्यप्रदेशाला देता येणार नाही. परंपरने हा हक्क पाकिस्तान व भारताचे पंजाब, गंगेचा मैदानी भाग व उत्तराखंड येथील बासमतीसाठी आहे. मध्यप्रदेशालाही हा हक्क मिळाला तर निर्यातीतील स्पर्धा वाढणार आहे. बासमतीची दरवर्षाची निर्यात ३० हजार कोटींची आहे. मध्यप्रदेशातील ४ लाख शेतकरी बास्मतीचे उत्पादन घेत आहेत.

Leave a Comment