नवी दिल्ली : पुन्हा एकदा मोदी सरकार देशातील जनतेला गोड बातमी देणार असल्याचे संकेत असून सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर एक रुपयाने उतरण्याची शक्यता आहे.
पुन्हा स्वस्त होणार पेट्रोल आणि डिझेल !
१५ नोव्हेंबरला मोदी सरकार पुन्हा एकदा डिझेल आणि पेट्रोलच्या दरात कपात करण्याची घोषणा करु शकते. याआधी मोदी सरकारने पेट्रोलच्या दरात २.४१ रुपयांनी आणि डिझेलच्या दरात २.२५ रुपयांनी कपात केली होती.
सरकारने डिझेल नियंत्रणमुक्त केल्याने आता पेट्रोलसह डिझेलच दर बाजारानुसार निश्चित होणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने देशातील तेल कंपन्यांना फायदा होत आहे.